Vaibhav Naik : गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण महाराष्ट्रात चर्चिले जात आहे. विशेषकरून मालवणमधील राजकारण तापले असून, काल मध्यरात्री पोलिसांना एका गाडीत तपासणीवेळी दीड लाखांची रोकड सापडली. या प्रकाराची माहिती शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट मालवण पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पुन्हा एकदा पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील संघर्ष समोर आला आहे. आता यानंतर पैसे वाटप प्रकरणात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेतली असून त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप केले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे कोकणातील राजकारण आणखी तापणार आहे. एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत, असा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक्सवरून पोस्ट केला आहे. शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिकमध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र! असे म्हटले आहे. शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या लोकशाही ची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र! @ECISVEEP @Dev_Fadnavis pic.twitter.com/TKXOXrv7FS — Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2025 हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात; ३५ ते ४० विद्यार्थी जखमी