Uddhav Thackeray meets Raj Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. आज सकाळी 11.30 वाजता उद्धव ठाकरे एकटेच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आगामी निवडणुकांवर दोघांमध्ये थेट चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा होत असताना आजच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. Uddhav Thackeray meets Raj Thackeray | तसेच मनसेला महाविकास आघाडीत सामील करुन घेण्याबाबत उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरु आहे. याबाबत काही निर्णय होणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. Uddhav Thackeray meets Raj Thackeray | हेही वाचा : “दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले”; ‘त्या’ पोस्टरवरुन अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाण