Expansion of Yogi cabinet : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आज आणखी चार मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी चार आमदारांना आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या समावेशामुळे आता मंत्र्यांची संख्या २२ झाली आहे. | Expansion of Yogi cabinet
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी अर्थात एसबीएसपीचे प्रमुख ओमप्रकाश राजभर, राष्ट्रीय लोकदलाचे नेते अनिल कुमार, भारतीय जनता पार्टीचे नेते दारासिंह चौहान आणि सुनीलकुमार शर्मा यांनी आज पदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यावेळी उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी राजभर यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत सूचक इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना आज मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. | Expansion of Yogi cabinet
#WATCH | Lucknow | Uttar Pradesh Governor Anandiben Patel and CM Yogi Adityanath arrive at the swearing-in ceremony of the four new ministers of the State Cabinet. pic.twitter.com/dRF0saPymc
— ANI (@ANI) March 5, 2024
आपल्यावर ही मोठी जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशातील गरिब, दलित मागासवर्गिय आणि अल्पसंख्यकांसाठीच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सरकार कटीबध्द असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, लोकदलाचे अनिल कुमार यांनी त्यांना संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांचे आभार मानले आहेत. | Expansion of Yogi cabinet