डॉ. राजू गुरव/प्रकाश बिराजदार – महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेत “विमाननगर-सोमनाथनगर’ या पूर्वीच्या प्रभागाचा बहुतांश भाग तोडण्यात आला असून “लोहगाव-विमाननगर’ या नवीन प्रभागाची निर्मिती झाली आहे. महापालिका हद्दीत लोहगावचा नव्याने समावेश करण्यात आल्याने महापालिका निवडणूकीसाठी इच्छुकांमध्ये या भागातील उमेदवार अधिक आहेत. जून्या प्रभाग रचनेत या प्रभागात भाजपचे चारही नगरसेवक आहेत. आता, राष्ट्रवादी विरुध्द भाजप अशीच रंगत या प्रभागाच्या निवडणूकीत पहायला मिळणार आहे. या ठिकाणच्या दोन उमेदवारांना महापालिकेत जाण्याची संधी निश्चितच मिळणार आहे.
प्रभागातील समाविष्ट भाग
लोहगाव, कलवड, खेसेपार्क पार्ट, कुतवळ कॉलनी, औरम एलिमेंटो सोसायटी, वायुसेनानगर, उत्तरेश्वरनगर, साठेनगर, लोहगाव बस स्टॉप, माथाडे वस्ती, मोझे चाळ, शिवनगर, चीरके कॉलनी, निंबाळकर नगर, पॅरामाउंट स्माट्र सिटी, गुडविल काउंटी, खंडोबा माळ, मंत्री पार्क, हरणतळेवस्ती, प्राइम लोटस रो-हाऊस सोसायटी, खंडोबा माळ, मंत्रीपार्क, प्राइम रो-हाऊस, सोसायटी, एमएमआयटी कॉलेज वडगाव शिंदे रोड, कावेरी इंटरनॅशनल स्कूल, पोलीस मेगा सिटी, पर्पल टच प्रोजेक्ट, लोटस व्हॅली, माउंट सेंट पॅट्रीक ऍकॅडमी, गुरुकृपा कॉलनी, वृंदावनपार्क, पवारवस्ती, योजनानगर, दादाची वस्ती, संतनगर, आदर्शनगर, खेसे वस्ती, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर फोर्स कॅम्पस, विमानगर, फिनिक्स मॉल, इडन गार्डन सोसायटी, साकोरेनगर पार्ट, कवडे वस्ती, खांदवेनगर पार्ट, तुळजाभवानीनगर पार्ट.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
लोहगाव येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी 30 लाख लिटरची एक तर विमाननगरमध्ये 45 लाख लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या उभारल्या. जलवाहिन्यांची कामे केली. लोहगाव येथे ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून कामे सुरू झाली आहेत. राहुल भंडारे (भाजप)
विविध ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबरोबरच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला. विमाननगर येथे उद्यानाचे काम सुरू असून मेडिटेशन हॉल उभारण्याला प्राधान्य दिले. बालकांसाठी स्वतंत्र दवाखाना उभारण्यात येणार आहे.श्वेता गलांडे-खोसे (भाजप)
प्रभागात गरजेनुसार उद्याने, मराठी शाळा विकसित केली. यमुनानगर येथे प्रशस्त ग्रंथालय उभारण्याचे काम सुरू झालेले आहे. बर्मासेल येथे गांडुळ खत प्रकल्प उभारला. नाल्याच्या सिमा भिंतींची कामे मार्गी लावली यामुळे नागरिकांची मोठी समस्या दूर झाली आहे.मुक्ता जगताप (भाजप)
नागरिकांच्या मागणीनुसार रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करून कामे केली. टप्प्याटप्प्याने निधी मिळाल्याने त्यानुसारच प्राधान्यक्रम ठरवून कामे मार्गी लावली. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कामे केली आहेत. बापूराव कर्णे (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
बर्मासेल, गांधीनगर, यमुनानगर या भागातील शौचालयाचा बिकट प्रश्न लोकप्रतिनिधींना सोडविताच आलेला नाही. कलवड, दादाची वस्ती, गुरुद्वारा हा भाग विकासापासून जाणीवपूर्वकपणे वंचित ठेवण्यात आला. लोकप्रतिनिधींनी नुसत्याच हद्दी ठरवून घेतल्या.आनंद सरवदे (राष्ट्रवादी)
प्रभागात गरजेची अशी नवीन कोणतीच कामे झालेली नाहीत. पूर्वी झालेल्या विकासकामांची देखभाल-दुरुस्ती करून ती कामे सुस्थितीत ठेवणे आवश्यक होते. मात्र, पूर्वी झालेल्या विकासकामांची दुर्दशा झाली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीचे काम रेंगाळले आहे. उषा कळमकर (राष्ट्रवादी)
खेसेपार्क, कलवड, दादाची वस्ती, गुरुद्वारा या भागात लोकप्रतिनिधींनी काहीच कामे केली नाहीत. प्रभागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. रस्त्यांची खड्डयांमुळे दूरवस्था झाली असून ड्रेनेजलाइनचीही कामे झालेली नाहीत. डीपी रस्ते विकसित केले नाहीत. सुरेखा खांदवे (राष्ट्रवादी)
नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्षच दिले नाही. केवळ विमाननगर भागातील कामे करण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त होते. कृत्रिम पाणी टचांई निर्माण केली. कचऱ्याचे ढिगच्या ढिग पडत असून सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था झाली आहे. रमेश आढाव (राष्ट्रवादी)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : राहूल भंडारे, संतोष (लाला) खांदवे, सुनील खांदवे-मास्तर, मोहनराव शिंदे-सरकार, तनुजा शिंदे-सरकार, संदीप मोझे, रावसाहेब राखपसरे. राष्ट्रवादी : अशोक खांदवे, नवनाथ मोझे, राजेंद्र खांदवे, बंडू खांदवे, डॉ. राजेश साठे, मिलिंद खांदवे, उज्ज्वला खांदवे, सुभाष ओव्हाळ, संतोष राखपसरे, तुषार खरात, विकास झेंडे. शिवसेना : सोमनाथ खांदवे, प्रतीक्षा अमित जंगम. कॉंग्रेस : दीपक खांदवे, भुजंग लव्हे, सागरताई रोकडे, राजेंद्र शिरसाट, राहुल लव्हे, राहुल शिरसाट, अभिजित रोकडे. मनसे : कृष्णा मोहिते. आमआदमी पक्ष : फुलचंद म्हस्के. पक्ष अनिश्चित : प्रीतम खांदवे.