पुणे- जिल्ह्याच्या दुर्गंम भागात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पुरवण्याच्या संजीवन भारत योजनेचा प्रारंभ बुधवारी मंचर येथे होत आहे. केईएम हॉस्पिटल रिसर्च संस्था ब्रिटिश सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या आधारे ही योजना राबवण्यात येत आहे. शहरातील वोलार अल्ट्रा या स्टार्टअपच्या सहाय्याने ही योजना पूर्णत्वास जाणार आहे.
मंचरला एक ड्रॅन पुरवून या सेवेचा शुभारंभ होत असला तरी त्यातून जिल्ह्यातील सर्व दूर्गम भागात अशा स्वरूपाची सेवा देण्याचा प्रयत्न आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर ड्रोनद्वारे केवळ औषधेच नव्हे तर अन्न धान्यही पोहचवण्याची ही योजना आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत प्राथमिक अथवा समाज आरोग्य केंद्राद्वारे पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पासाठी 70 हजार डॉलर्सचा निधी (सुमारे 60 लाख रुपये) उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुरुवातील मंचर आणि जुन्नर पट्ट्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या समस्येवरही मात होईल, असे त्यांनी सांगितले.
यासाठी ड्रोनच्या सर्व प्रकारच्या सुविधा वोलार अल्ट्राकडून पुरवण्यात येत आहेत. ड्रोनच्या किमती आणि त्याच्या वहन क्षमतेच्या मर्यादा ही योजनेपुढील मुख्य आव्हाने होती. जगभरातील अनेक ड्रोन उत्पादकांशी बोलल्यानंतर त्यातील मुख्य अडचण येत होती ती म्हणजे एका
ठिकाणी सामान उतरवल्यानंतर तो ड्रोन मुख्य तळअवर आणून त्याला रिचार्ज अथवा त्याचे इधन भरावे लागणार होते. त्यानंतर त्याचा टेक ऑफ किंवा दुसरी डिलीव्हरी करावी लागत होती. या प्रकल्पात आता व्होलार अल्टाचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे एका टेक ऑफमध्ये एका पेक्षा अधिक ठिकाणी टप्प्याने वाहतूक करता येते का याची चाचणी घेण्यात येत आहे
ड्रोनच्या सहाय्याने व्हॅक्सिन पोहचविणे, त्याचे तापमान व्यवस्थित राहते का, यासह अनेक बाबींचा अभ्यास करण्यासाठी आज मंचर येथे प्रात्यक्षित करण्यात येणार आहे. या अधी ड्रोनच्या मदतीने पॉईंट टू पॉईंट औषधे किंव व्हॅक्सिन पोहोचविले जाऊ शकतात. मात्र, सध्या जे प्रात्यक्षिक करतोय, त्यामध्ये दोन ठिकाणी ड्रोन व्हॅक्सीन देण्यासाठी खाली उतरविण्यात येणार आहे.
मंचर येथील अवसरी येथून हे ड्रोन ठरावीक उंचीवरून पिंपळगाव याठिकाणी जाईल. त्याठिकाणी व्हॅक्सीन दिल्यावर पुन्हा ड्रोन उड्डाण करून निरगुडसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी जाईल. हे प्रात्यक्षित नक्कीच यशस्वी होईल. त्यामध्ये ठरावीक उंचीवर ड्रोन गेल्यावर व्हॅक्सीनचे तापमान मेंटेन होते का हे पाहणार आहे. यासाठी ऋतुजा पाटील यांच्यासह टीमचे काम महत्वाचे आहे.
-प्रो. संजय जुवेकर, प्रोफेसर ग्रामीण आरोग्य कार्यक्रम केईएम, वढू