Munawar Faruqui| ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुनव्वर फारुकीचा मित्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुनव्वर हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर चाहते देखील त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मुनव्वरच्या हाताला आयव्ही ड्रिप लावलेले दिसत आहे. मुनव्वरच्या मित्राने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘माझा भाऊ मुनव्वर फारुकी लवकर बरा व्हावा.’ परंतु मुनव्वरला नेमकं काय झालं आहे? या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मात्र मुनव्वरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी ते प्रार्थना करत आहेत. प्रकृती खराब झाल्यामुळे मुनव्वर रुग्णालयामध्ये दाखल होण्याची ही पहिली वेळ नाही. मागच्या महिन्यात देखील त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. Munawar Faruqui|
दरम्यान, मुनव्वर स्टँडअप कॉमेडियन आहे. ‘बिग बॉस 17’ चा मुनव्वर फारुकी विजेता आहे. मुनव्वरसोबत या शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण हे अन्य चार स्पर्धक अंतिम फेरीत होते. मात्र सर्वात जास्त मत मिळवत त्याने बिग बॉस 17 च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
हेही वाचा :
बोल्ड अभिनेत्रीच्या टॅगबाबत नीना गुप्ताने केला धक्कादायक खुलासा