पिंपरी – फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने इंजिनिअर महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिचे नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. मोशी व आकुर्डी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकार घडला. विक्रम गणपत फडतरे (वय 34, रा. भिलारेवस्ती, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याप्रकरणी पीडित 30 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 22) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. विक्रम फडतरे हा पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे. विवाहित असलेली पीडित फिर्यादी महिला इंजिनिअर असून एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.
पोलीस कर्मचारी असलेल्या विक्रम फडतरे याने इंजिनिअर महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तिच्याशी मैत्री वाढवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, इंजिनिअर महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित केले.