पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ध्रुव ग्लोबल स्कूलच्या मुलांनी वाल्मिकी रामायणावर आधारित अप्रतिम रामायण महानाट्य सादर करून हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले. इयत्ता ४ थी ते ११ वी पर्यंतच्या ४५० हून अधिक मुलांची कलाकृती वाखण्याजोगी होती.
सुमारे २ तास २० मिनिटे चाललेल्या या नाटकाला ३० हजारांहून अधिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन लहान मुलांच्या कलेपुढे नतमस्तक झाले. सीतेचे अपहरण, लंका जाळणे, रामसेतू बांधणे, हनुमंताने आकाशातून वनौषधी आणणे, राम रावणाचे युद्ध मुलांनी कौशल्याने सादर केल्याने उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.
ध्रुव ग्लोबल स्कूल व गीता परिवार यांच्या सहयोगाने ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या जन्मोत्सवानिमित्त वाल्मिकी रचित रामलीला नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी स्वामी गोविंदगिरी महाराज, संजय मालपाणी, यश मालपाणी, मुख्याध्यापिका संगीता राऊत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.