Ashok Kharat : मुंबईत उघडकीस आलेल्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात अशोक खरात याच्या कथित आर्थिक जाळ्याचा तपास वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED)ने प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत. (Ashok Kharat) समता नागरी सहकारी पतसंस्थेतील संशयित आर्थिक व्यवहारांशी संबंधित या प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान काही खात्यांमधून १.२० कोटी ते २.४० कोटी रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याचे समोर आले असून ही खाती अशोक खरातशी संबंधित असल्याचा संशय आहे. १३४ हून अधिक प्रॉक्सी अकाऊंट्स चालवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. (Ashok Kharat) या सर्व खात्यांचा नॉमिनी एकच असल्याचे आणि खाती उघडताना एकाच मोबाईल नंबरचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र प्रतिभा चाकणकर यांनी या आरोपांचे खंडन करत ही सर्व खाती बनावट असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या नावाने खोटी स्वाक्षरी करून खाती उघडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Ashok Kharat) तपास यंत्रणांच्या माहितीनुसार २०२२ ते २०२४ दरम्यान सुमारे ७० कोटी रुपयांहून अधिक संशयित व्यवहार झाले असल्याचा अंदाज आहे. धार्मिक कार्यांच्या नावाखाली लोकांकडून आधार आणि पॅनसारखी कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे ‘बेनामी’ आणि ‘घोस्ट’ अकाऊंट्स तयार करून पैशांची लेयरिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Ashok Kharat) दरम्यान, या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक संदीप कोयते यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एकाच मोबाईल नंबरवर आणि एकाच नॉमिनीवर मोठ्या प्रमाणात खाती उघडली जात असताना बँक यंत्रणेने कोणतीही दक्षता का घेतली नाही, याचाही तपास सुरू आहे. (Ashok Kharat)