Raj Thackeray : राज्यात गाजत असलेले बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात दररोज नवे हादरवणारे खुलासे समोर येत आहे. रोज काही ना काही नवी माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होते. सत्ताधारी पक्षातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो समोर आले. यानंतर त्यांच्या चौकशीची मागणी विरोधक करताना दिसले. अशातच आता या प्रकरणावर पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मोठं विधान केले आहे. शेताला पाणी मिळत नाही पण खरातला पाणी मिळत. हे प्रकरण पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवलेली बाहेर काढतात, असे मोठं विधान राज ठाकरे यांनी केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून प्रबोधनाचे महान कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी कै. काकासाहेब पुरंदरे पुरस्कार सोहळ्याचं 15 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्यांनी भाषणात अशोक खरात प्रकरणात भाष्य केले. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? अनेक पत्रकार त्रास सहन करत आहेत, अनेक बंधन आहेत. मला आताच्या पत्रकार मुला मुलीचं वाईट वाटतं. कारण, ऑफिस म्हणत काहीतरी घेऊन या, काय घेऊन या? कांदे चालतील? नाही. मग काय हे असे बोलले ते तसे बोलले झुंजवा. मग, प्रकरण आई बहिणींपर्यंत जातं, असे म्हणत राज ठाकरेंनी आताच्या पत्रकारितेबाबत आपले प्ररखड मत मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले कोणतरी आला खरात. शेताला पाणी मिळत नाही पण खरातला पाणी मिळत. ही प्रकरण पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवलेली बाहेर काढतात, असे म्हणत राज ठाकरेंनी खरात प्रकरणावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया जाहीर कार्यक्रमातून दिली. राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत राज ठाकरे यांनी भाषणात बोलताना सांगितलं की, मला खंत याच गोष्टीची आहे की मी आचार्य अत्रेंना पाहू शकलो नाही. फक्त त्यांच्याबद्दल कथा, गोष्टी ऐकल्या. पण आचार्य अत्रेंना पाहू शकलो नाही याची ती उणीव कै. काकासाहेब पुरंदरे यांनी भरून काढली. मी काकासाहेब पुरंदरे यांना दोनदा ते तीनदा भेटलो. त्यांनी आचार्य अत्रेंसोबत काम केलंय हे काका साहेबांच्या व्यक्तिमत्वात दिसायचं. आचार्य अत्रेंच्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्या. त्याप्रकारची पत्रकारिता आता होईल असं मला वाटत नाही. हेही वाचा : PCMC 52 Crore Scam : ७० कामांची बिले ‘त्या’ ठेकेदारांच्या खात्यात जमा; स्थायी समिती सभापतींचा मोठा खुलासा