फुरसुंगी -राज्यातील महापालिकांच्या निवडणुका रखडल्याने विकासकामांवर मोठा परिणाम होत आहे. राज्य सरकार विरोधकांच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
वडकी गाव येथील श्री शंभू महादेव मंदिराच्या कामाची पाहणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. यावेळी त्या बोलत होत्या. मंदिराच्या कामासाठी खासदार व आमदार निधी निधीतून निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. श्री शंभू महादेव देवस्थान मंदिर नूतनीकरणाचे काम सुरू असून यासाठी अंदाजे चार कोटी रुपये खर्च येणार आहे. गावकऱ्यांनी आत्तापर्यंत 80 लाख रुपये जमा केले. खासदार सुळे यांनी यावेळी राज्य सरकारच्या कामाची पद्धत तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या प्रशासकीय गोंधळावर टीका केली.
यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पंडित मोडक, माजी सभापती सचिन घुले, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, विश्वस्त बाळासाहेब साबळे, रविंद्र पवार, संदीप मोडक, रामदास आंबेकर, आबा मोडक, अभिजित मोडक, सुनील गायकवाड, माजी सरपंच उत्तम गायकवाड, सचिन मोडक, ग्रामपंचायत मच्छिंद्र गायकवाड, रमेश मोडक, संतोष गायकवाड, सगाजी मोडक, पंकज मोडक, हवेली शिवसेना अध्यक्ष संदीप धाडसी मोडक, नेहा मोडक, अविनाश मोडक, वर्षा गायकवाड, वैशाली मोडक, शैला मोडक, आरती गायकवाड, कल्पना पवार, संगीता मोडक, स्वाती गायकवाड, अशोक मोडक आदीसह पंचक्रोषितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताईंच्या लग्नाचा वाढदिवस…
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वडकी ग्रामस्थांच्या वतीने केक कापून सुळे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ग्रामस्थांच्या आग्रहामुळे सुप्रियाताई यांचे पती सदानंद सुळे या छोट्याशा कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले होते. वडकी गावातील सर्व महिलांनी एकत्रितपणे सुप्रियाताई सुळे यांना साडी भेट दिली.