नेवासा – नेवासा पोलिस ठाण्याचे दबंग पोलिस निरिक्षक म्हणून धडाकेबाज कारवाई करण्यासाठी परिचित असलेले निरिक्षक विजय करे यांनी खंडणी प्रकरणात नेवासा पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरिक्षक बाजिराव पोवार व पञकार सुनिल गर्जे यांच्यावर खंडणी प्रकरणात फिर्याद दाखल करुन घेतल्याने जिल्ह्यासह राज्यात पोलिस दलासह पञकारांत एकच खळबळ उडवून दिली त्यामुळे पोलिस निरिक्षक करे यांचा नेवासा पोलिस ठाण्यावर चांगलाच ‘दबदबा’ निर्माण झाला असून गुन्हेगारांवर ‘वचक’ निर्माण झाला आहे.
मुलीला पळवून नेण्याच्या एका प्रकरणात झालेल्या घडामोडीत कलमे कमी लावण्यासाठी पैसे मागितल्याचा वहिम आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या ठाकलेल्या तत्कालिन पोलिस निरिक्षक पोवार व पञकार गर्जे यांच्यावर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने निरिक्षक करे जिल्ह्यासह राज्यात दबंग पोलिस अधिकारी म्हणून चर्चिले जात आहेत.मुलीच्या अपहरण प्रकरणात पैसेची मागणी करुन ते स्विकारलेलेही असून पुन्हा माघारीही दिल्याचा आरोपही दाखल झालेल्या फिर्यादीत केलेला आहे त्यामुळे या प्रकरणाचे बालंट पोवार व गर्जे यांच्या अंगावर आलेले आहे त्यामुळे एक पोलिस निरिक्षक आणि एक पञकार आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला गेल्याने या घटनेची चर्चा जिल्ह्यासह राज्यात चर्चिली गेलेली आहे
एका तत्कालिन पोलिस निरिक्षकाने जेथे काम केले त्या पोलिस ठाण्यातच त्यांच्यासह एका पञकारावर गुन्हा दाखल झाल्याची दुर्देवी वेळ घडलेल्या घटनेवरुन नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे ऐनकेन प्रकारे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नेवासा पोलिस ठाण्याची पुरती अब्रु पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली असून असे धाडस पुन्हा कोणी करु नये म्हणून दबंग पोलिस अधिकारी करे यांनी घडलेल्या घटनेची दिलेली फिर्याद नोंदवून घेतल्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात एक पोलिस निरिक्षक आणि पञकार अडकून बसला आहे त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीच्या कचाट्यातून हळूहळू सावरु लागलेले नेवासा पोलिस ठाणे पुन्हा बदनामीच्या शिकारीत अडकलेले असल्यामुळे खाकीसह पञकारांची अब्रु चव्हाट्यावर आलेली आहे.