मंचर-पुणे येथे आयोजित मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत डॉ. ज्योती पवार विजयी ठरल्या. प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा घेऊन विजयी स्पर्धकांची अंतिम स्पर्धा बालेवाडी येथे संपन्न झाली.
ऊर्जा हेल्थकेअर पुणे यांच्या वतीने ऍलोपॅथिक, होमिओपॅथी, आयुर्वेद, डेंटिस्ट या विवाहित महिला डॉक्टरांसाठी स्पर्धा होती. यामध्ये मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांच्या पत्नी डॉ. ज्योती पवार विजयी झाल्या. त्यांना “मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र ब्युटी विथ परपज 2020” या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. त्यांना विजयी मुकुट परिधान करण्यात आला.
स्पर्धेत नागपूर, अमरावती, लातूर, सांगली, बीड, परभणी, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथील 65 स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी सहभाग नोंदवला. स्त्रियांचे आरोग्य या संकल्पनेवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सौंदर्य, कलागुण, सामाजिक कार्य हे निकष ठेवण्यात आले. विजयानंतर डॉ. ज्योती पवार यांनी महिला आरोग्यासाठी काम करणार असून आनंदी ऊर्जा ही संकल्पना राबविण्यासाठी चर्चासत्र, जनजागृती, कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले. स्पर्धेचे आयोजन डॉ. प्रेरणा कालेकर, डॉ. मनीषा गरुड, डॉ. रितू लोखंडे, डॉ. ज्योती माटे यांनी केले.