मुंबई – गायक अवधूत गुप्ते नेहमीच नव्या गाण्यांची मेजवानी रसिक वर्गासाठी घेऊन येत असते. त्याच्या गाण्याला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने मनसे पक्षाचं नवं गाणं गायलं होतं. या दमदार गाण्याची सर्वत्र चर्चा झाली होती. त्यानंतर आता अवधूतने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त नवं गाणं सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे.
अवधूतने शेअर केलेल्या या गाण्याचे बोल ‘गाऊ.. बुद्धम शरणम..’ असे आहे. गायक संतोष जोंधळे यांनी गायले आहे. तर अवधूतच्या एकवीरा प्रोडक्शनने त्याची निर्मिती केली आहे. सर्वांना नाचण्यास भाग पडणारं हे गाणं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रचंड पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत अवधूतने पोस्टमध्ये लिहिले की, ‘परमपूज्य बोधीसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! यंदा खास संतोष जोंधळेच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं हे भीमगीत लोकार्पित झाल्यानंतर आता तुमचं बोट धरून हळूहळू रांगू लागलं आहे, मोठं होत आहे. ह्या गाण्याला तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल एकविरा प्रॉडक्शनच्या संपूर्ण चमू तर्फे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो! जय भीम!! जय शिवराय!! जय हिंद!! जय महाराष्ट्र’. दरम्यान, हे गाणं एका कार्यक्रमात सादर करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. यात चिमुकली मुले देखील या गाण्यावर चांगलाच ठेका धरत असल्याचे पाहायला मिळते.