पुणे – पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना, आर्यन्स क्रिकेट क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र आणि ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी या संघांनी विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत स्वप्निल फुलपगार (नाबाद 167 धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 22 यार्डस संघाचा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 50षटकात 6 बाद 376 धावा केल्या. याच्या उत्तरात 37.4 षटकात सर्वबाद 171 धावाच करू शकला.
दुसऱ्या सामन्यात आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने रिक्रिएशन क्रिकेट क्लबचा 274 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पीबीकेजेसीए संघावर 4 धावांनी विजय मिळवला. ब्रिलियंट स्पोर्टस अकादमी संघाने केडन्स संघाचा 75 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उद्घाटन एमसीएचे मानद सचिव शुभेंद्र भांडारकर, दोशी इंजिनिअर्सचे संचालक अमित दोशी आणि राजीव एन्टरप्रायझेसचे विजय जना यांच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव आणि सचिव सिद्धार्थ निवसरकर, पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, आशुतोष सोमण, निरंजन गोडबोले, नंदन ठाकूर आणि पराग शहाणे आदी उपस्थित होते.