FIFA-Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाने शांतता पुरस्कार प्रदान केला आहे. ट्रम्प यांना हा नवीन फिफा शांतता पुरस्कार शुक्रवारी २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेच्या ड्रॉमध्ये प्रदान करण्यात आला आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी ट्रम्प यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार फिफाचा पहिला शांतता पुरस्कार आहे. फिफाने पहिल्यांदाच हा पुरस्कार सुरू केला आणि तो थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नोबेल शांति पुरस्काराच्या धर्तीवर आहे, ज्याची ट्रम्प यांना नेहमीच इच्छा होती. फिफाने यापूर्वीच हा पीस अवॉर्ड डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याची घोषणा केली होती, आता कार्यक्रमादरम्यान फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी त्यांना ट्रॉफी, पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया याबाबत ट्रम्प यांनी म्हटलं की, “हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक आहे. पुरस्कारापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले. काँगो हे याचं एक उदाहरण आहे. तसेच आम्ही भारत-पाकिस्तान संघर्षासह अनेक संघर्ष रोखण्यास देखील मदत केली. तर काही वाद आम्ही सुरू होण्याआधीचं थांबवले.” दरम्यान, ट्रम्प हे शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी नोबेल पारितोषिकासाठी अनेकदा इच्छाही बोलून दाखवली होती. मात्र, त्यानं शांततेचा पुरस्कार मिळाला नाही. तर व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. FIFA-Donald Trump | फुटबॉल विश्वचषक २०२६ – फुटबॉल विश्वचषक २०२६ ची सुरुवात ११ जूनपासून होईल आणि तो १९ जुलैपर्यंत असेल. यात ४८ संघ मैदानात उतरतील, ज्यांना ४-४ संघांचे १२ ग्रुप्समध्ये विभागले जाईल. ग्रुप स्टेजमध्ये सर्व संघ एकमेकांशी एकेकदा खेळतील. ६८ ग्रुप-स्टेज सामन्यांनंतर १२ ग्रुप्समधील पहिल्या दोन संघ थेट राऊंड ऑफ ३२ साठी पात्र ठरतील. त्यांच्यासोबत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ८ तिसऱ्या क्रमांकाच्या संघांचाही समावेश असेल. नॉकआऊट फेरी ३२ पासून सुरू होईल, त्यानंतर राऊंड ऑफ १६, चार उपांत्यपूर्व फेरी, दोन उपांत्य फेरी आणि शेवटी १९ जुलै रोजी अंतिम सामना होईल. स्पर्धेची सुरुवात मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होईल. हेही वाचा इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होणार; फडणविसांनी थेट तारीख सांगितली…