India Football Team : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूचे होणार पदार्पण
आगामी एएफसी आशियाई चषक २०२७ च्या पात्रता फेरीसाठी भारतीय फुटबॉल संघाची (India Football Team) घोषणा करण्यात आली असून, यामध्ये ऑस्ट्रेलियात जन्मलेला अनुभवी फॉरवर्ड रायन विल्यम्सचे भारतीय संघाकडुन पदार्पण होण्याची शक्यता आहे.

India Football Team : आगामी एएफसी आशियाई चषक २०२७ च्या पात्रता फेरीसाठी भारतीय फुटबॉल संघाची (India Football Team) घोषणा करण्यात आली असून, यामध्ये ऑस्ट्रेलियात जन्मलेला अनुभवी फॉरवर्ड रायन विल्यम्सचे भारतीय संघाकडुन पदार्पण होण्याची शक्यता आहे.
येत्या ३१ मार्च रोजी कोची येथे हाँगकाँगविरुद्ध होणाऱ्या या लढतीसाठी मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी २३ सदस्यीय संघ (India Football Team) जाहीर केला आहे.
रायन विल्यम्सच्या समावेशामुळे भारतीय फुटबॉलच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. फिफाने त्याच्या असोसिएशन बदलाला अधिकृत मान्यता दिल्यानंतर, ३१ वर्षीय विल्यम्सचा भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेष म्हणजे, २०१३-१४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अराता इझुमी यांच्यानंतर भारतीय वंशाचा परदेशात जन्मलेला तो केवळ दुसरा फुटबॉलपटू ठरेल. विल्यम्सची आई मुंबईतील अँग्लो-इंडियन कुटुंबातील असून, भारताकडून खेळण्यासाठी त्याने गेल्या वर्षी आपल्या ऑस्ट्रेलियन पासपोर्टचा त्याग केला होता.
भारतीय संघ आशियाई चषकाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी हाँगकाँगविरुद्धचा सामना जिंकून मोहिमेचा समारोप सकारात्मक करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल. प्रशिक्षक खालिद जमील यांनी संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडुंना प्राधान्य दिले आहे.
सध्या कोची येथे सराव शिबिराला (India Football Team) सुरुवात झाली असून, अनवर अली, जॅकसन सिंग आणि एडमंड लालरिंदिका हे खेळाडू आपल्या क्लबमधील सामने आटोपून लवकरच संघात सामील होतील.






