FIFA Women’s Rankings : महिला विश्वचषक विजेत्या स्पेनने यूएफा (UEFA) नेशन्स लीगच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी जाहिर झालेल्या फीफा क्रमवारीत एक स्थान वर सरकून अव्वल स्थान पटकावले आहे.
महिला विश्वचषकानंतर ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेल्या फिफा क्रमवारीत स्वीडन अव्वल स्थानावर होता पण आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर या क्रमवारीत यूएसए एक स्थान वर सरकून दुसऱ्या, फ्रान्स 2 स्थान वर सरकून तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर कायम आहे.
World champs Spain move into the top spot of the FIFA women’s world rankings 🇪🇸 pic.twitter.com/AAJjTo6ApK
— B/R Football (@brfootball) December 15, 2023
या महिन्यात नेशन्स लीगमध्ये स्पेनने त्यांच्या गटात अव्वल स्थान पटकावले. चार संघांच्या या गटात स्वीडन तिसऱ्या स्थानावर होता. महिला फुटबॉलमध्ये स्पेनने प्रथमच अव्वल स्थान गाठले आहे. (Spain claim top spot in Women’s FIFA rankings for first time) अमेरिका, फ्रान्स आणि विश्वचषक उपविजेत्या इंग्लंडला मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले.
INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…
फीफा (FIFA) ने सांगितले की, 211 सदस्यांपैकी 192 सदस्यांना या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. यामध्ये भारतीय संघ चार स्थानांच्या नुकसानासह 65 व्या स्थानावर आहे.