राहुल गांधींसाठी काँग्रेसकडून नोबेल पुरस्काराची मागणी? मारिया मचाडो यांच्याशी तुलना करत सांगितले साम्य

Rahul Gandhi And Nobel Prize | व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. एकीकडे नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प थयथयाट करत असताना दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी भारताच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तुलना थेट मारिया मचाडो यांच्याशी केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी शुक्रवारी मारिया मचाडो आणि राहुल गांधी यांच्यातील साम्य सांगितले. सुरेंद्र राजपूत यांनी मारिया कोरिना मचाडो आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो एक्सवर शेअर केला.
या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात की, “यावेळेचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना संविधानाचे रक्षण केल्याबद्दल मिळाला आहे. भारतात विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत.” याद्वारे काँग्रेस प्रवक्त्यांनी राहुल गांधी हे देखील भारतात संविधान वाचवण्यासाठी लढत असल्याने या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पात्र आहेत, असे म्हंटले. Rahul Gandhi And Nobel Prize |
एकेकाळचा लोकशाहीप्रधान असलेला व्हेनेझुएला हुकूमशाहीकडे वळाला. या देशाचे राजकीय व सांस्कृतिक स्वरूप बदलले. अशा अस्थिर परिस्थितीत २० वर्षांपूर्वी मारिया कोरिना मचाडो हे नेतृत्व जनतेतून जन्मास आले. मचाडो यांनी मुक्त वातावरणात, निष्पक्षपाती, पारदर्शी निवडणुका घेण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. पण आपल्या भूमिकेवरून त्या तसूभरही हलल्या नाहीत. Rahul Gandhi And Nobel Prize |
इस बार का नोबल शांति पुरस्कार वेनेजुएला की विपक्ष की नेता को मिला है संविधान की रक्षा करने के लिये।
हिंदुस्तान 🇮🇳 के विपक्ष के नेता श्री राहुल गांधी देश के संविधान को बचाने की लड़ाई लड रहे है । pic.twitter.com/xcgfkJixlZ— Surendra Rajput (@ssrajputINC) October 10, 2025
काँग्रेस नेत्यांच्या पोस्टवरून भाजपाने डिवचले
भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक्सवर पोस्ट करत सुरेंद्र राजपूत यांच्या पोस्टचा समाचार घेतला. पूनावाला यांनी राहुल गांधींना नोबेल देण्याची मागणी विचित्र असल्याचे म्हटले. तसेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकतो पण तो १) ढोंगीपणा २) खोटे बोलणे ३) ९९ निवडणुकांमध्ये पराभव होणे ४) १९७५ आणि १९८४ मध्ये लोकशाही आणि संविधानाची हत्या करणे. या कारणांसाठी त्यांना नक्कीच पुरस्कार मिळायला पाहिजे, असा टोला पूनावाला यांनी लगावला. Rahul Gandhi And Nobel Prize |
एनडीए सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा
दरम्यान, काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत आहे की, राहुल गांधी यांनी सध्याच्या एनडीए सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा उभारला आहे. त्यांनी अलीकडील काळात मत चोरी, बिहारमधील मतदार यादीतून जाणीवपूर्वक मतदारांची नावे वगळणे, निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना फायदा मिळवून देण्यासाठी ईव्हीएम हॅकिंग, मागासवर्गीयांसाठी आरक्षण संपवण्याचे कथित प्रयत्न यासारखे मुद्दे उपस्थित केले आहेत. Rahul Gandhi And Nobel Prize |
हेही वाचा :





