Donald Trump। व्हाईट हाऊसजवळ दोन नॅशनल गार्ड्सना गोळ्या घालण्यात आल्या आणि दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे, तो एक भयानक हल्ला आणि दहशतवादी कृत्य असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल असं म्हणत गंभीर इशारा दिलाय. तसेच त्यांनी पेंटागॉनला अमेरिकेच्या राजधानीत ५०० अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचे निर्देशही दिले आहेत. वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डच्या या सैनिकांवर व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर कॉम्प्लेक्स ताबडतोब बंद करण्यात आले आणि कायदा अंमलबजावणी संस्था परिसराची चौकशी करत आहेत. ट्रम्प त्यावेळी फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो क्लबमध्ये होते. “हा आपल्या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध गुन्हा आहे.” Donald Trump। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडिओ संभाषणात,” वॉशिंग्टन, डीसीमध्ये सेवा करणाऱ्या दोन नॅशनल गार्ड सदस्यांना थँक्सगिव्हिंग सुट्टीच्या पूर्वसंध्येला व्हाईट हाऊसपासून काही पावलांच्या अंतरावर एका भयानक हल्ल्यात गोळ्या घालण्यात आल्या. त्यांनी हा आपल्या संपूर्ण राष्ट्राविरुद्धचा गुन्हा आणि मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अफगाण नागरिकांची कडक तपासणी केली जाईल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी याविषयी बोलताना,” माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात अफगाणिस्तानातून अमेरिकेत प्रवेश केलेल्या प्रत्येक परदेशी व्यक्तीची पुन्हा तपासणी केली जाईल.” असे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी,’ नॅशनल गार्ड सदस्यांवर झालेल्या गोळीबाराबद्दल डीएचएसचा असा विश्वास आहे की संशयित २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत आला होता. ट्रम्पच्या घोषणेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या अफगाण नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणखी वाढतील, कारण आता त्यांची कडक तपासणी केली जाईल.” असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. एक संशयित ताब्यात Donald Trump। २९ वर्षीय रहमानउल्लाह लकनवाल या संशयिताला गोळीबारात जखमी झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. अफगाण नागरिक लकनवाल २०२१ मध्ये अमेरिकेत आल्याचे वृत्त आहे. न्याय विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या गोळीबाराची चौकशी दहशतवादी कृत्य म्हणून केली जात आहे.