प्रभात वृत्तसेवा न्हावरे – करडे (ता. शिरूर) परिसरात भारत पेट्रोल पंपावर रविवारी (दि. २३) सायंकाळी ७:४५ च्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सात जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. आरोपींनी लाथाबुक्क्या, लाकडी दांडक्यांनी तरुणाच्या डोक्यात व पाठीवर गंभीर मारहाण केली. याबाबत संकेत सुरेश गुजर (वय २१) याने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अजय वाळके याच्यासोबत आलेल्या पोपट वाळके, रवींद्र देशमुख, मयूर लंघे, वैभव वाळके तसेच इतर तीन आरोपींनी पेट्रोल पंपावर बेकायदेशीरपणे गर्दी जमवून दहशत निर्माण केली. या सर्वांनी फिर्यादीला तोंडावर लाथाबुक्क्यांनी तसेच दोन लाकडी दांडक्यांनी निर्घृण मारहाण केली, ज्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे समजते.या प्रकरणी सातही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार दीपक पवार करत आहेत.