“ख्रिश्चनांचा नरसंहार थांबवला नाही तर….” ; नायजेरियाला डोनाल्ड ट्रम्प यांची लष्करी कारवाईची धमकी

Donald Trump Threat। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारला कडक इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी, “जर ख्रिश्चनांच्या हत्या सुरूच राहिल्या तर अमेरिका नायजेरियाला मिळणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवेल.” अशी धमकी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी ही धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये, “जर परिस्थिती सुधारली नाही तर लष्करी हस्तक्षेप आवश्यक असेल. तसेच जर नायजेरिया सरकार निष्पाप ख्रिश्चनांच्या हत्या थांबवण्यात अपयशी ठरले तर अमेरिका केवळ त्यांची मदत थांबवणार नाही तर सशस्त्र देखील होऊ शकते.” असे म्हणत नायजेरियाला धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला संभाव्य कारवाईसाठी पूर्णपणे तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “जर हल्ला झाला तर तो जलद, निर्णायक आणि निर्दयी असेल, अगदी आपल्या ख्रिश्चन बांधवांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांप्रमाणेच. त्यांनी नायजेरिया सरकारला इशारा दिला की अमेरिका आता शब्दांनी नव्हे तर कृतीने प्रत्युत्तर देईल” असे देखील त्यांनी म्हटले आहे.
नायजेरिया सरकारने आरोप फेटाळले Donald Trump Threat।
नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी ट्रम्पचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आणि म्हटले की, “देशात कोणत्याही धार्मिक गटाचा संघटित छळ होत नाही. माहिती मंत्री मोहम्मद इद्रिस यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की अमेरिकेचे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत. नायजेरिया सरकार शांतता आणि धार्मिक सौहार्दासाठी वचनबद्ध आहे.”
नायजेरियातील ख्रिश्चन धर्म धोक्यात Donald Trump Threat।
नायजेरियाला विशेष चिंताजनक देश घोषित करताना ट्रम्प म्हणाले की, “देशातील ख्रिश्चनांचे अस्तित्व धोक्यात आहे.” त्यांनी लिहिले की “हजारो ख्रिश्चनांची हत्या केली जात आहे. हा एक नियोजित नरसंहार आहे आणि कट्टरपंथी इस्लामिक शक्ती यामागे आहेत”. त्यांनी अमेरिकन कायदेकर्त्या रिले मूर आणि टॉम कोल यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि लवकरच अहवाल सादर केला जाईल असे सांगितले.
ख्रिश्चनांच्या छळावर अमेरिका आता गप्प राहणार नाही
ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेने आता मानवतेसाठी उभे राहिले पाहिजे, असे सांगून की जगभरात ख्रिश्चनांची हत्या होत असताना गप्प राहणे हा गुन्हा आहे. अमेरिका आता फक्त पाहत राहणार नाही; ती कारवाई करेल. त्यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा नायजेरियाला अलीकडेच विशेष वॉचलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, जिथे धार्मिक हिंसाचार आणि दहशतवादी हल्ल्यांचे प्रकरण सातत्याने वाढत आहेत.





