- 81 करोनाबाधितांवर उपचार सुरू
पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 10) दिवसभरात 78 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. रुग्णालयामध्ये सध्या एकूण 81 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालय “हाऊसफुल’ झाले आहे.
जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी 86 खाटांची क्षमता आहे. त्यातील 81 खाटांवर करोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यातील 45 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून 17 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आळंदी, पुणे, पिंपळे गुरव, शिवाजीनगर, दापोडी, सांगवी, सोमवार पेठ, देहूरोड, पिंपळे गुरव, मांजरी, मुंढवा, दापोडी येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. धानोरी आणि काळेवाडी येथील हे रहिवाशी आहेत. पुणे शहरातील 1, पिंपरी-चिंचवडमधील 2 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 3 हजार 14 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1 हजार 36 रुग्ण बरे झाले आहेत. 1 हजार 354 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केलेले आहे.