शिक्रापूर-निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने नागरिक व ग्रामस्थांना 250 सॅनिटायझर व 1100 मास्कचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे, अजित चौधरी, सुनिता जायकर, अमित जायकर, अशोक जायकर, किरण थोरात, सागर चव्हाण, उमेश चौधरी, रवी चौधरी, प्रथमेश चव्हाण, मारुती गावडे, दादाभाऊ जायकर, सौरभ चव्हाण, मनोज तावरे, हर्षद चव्हाण, प्रशांत चव्हाण यांसह आदी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना करोना रोगाबाबत जनजागृती केली. तसेच ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे तसेच कुटुंबाची व स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केले.