T20 World Cup 2024 | कधी आहे टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना, 1 की 2 जूनला..? जाणून घ्या, अखेर का होतोय (Confusion) संभ्रम …

T20 World Cup 2024 (Date & Time Confusion) | आता टी-20 विश्वचषक 2024 सुरू होण्यासाठी एक दिवस बाकी आहे. सध्या विश्वचषक स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार की 2 जून, असा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: भारतीय चाहत्यांना त्यांच्या देशात कोणत्या वेळी सामने थेट पाहता येतील हे समजू (Date & Time Confusion) शकलेले नाही.
भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह 20 संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे, 16 सामने यूएसएमध्ये खेळले जाणार आहेत, तर उर्वरित 39 सामने कॅरेबियन बेटांवर खेळले जातील.
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2024 announced 🚨
Let’s get ready to cheer for #TeamIndia #T20WorldCup pic.twitter.com/jIxsYeJkYW
— BCCI (@BCCI) April 30, 2024
Date & Time Confusion : का आहे संभ्रम ?
वास्तविक, पृथ्वीचा मध्य भाग मानल्या जाणाऱ्या ग्रीनविच नावाच्या ठिकाणावरून पृथ्वीवरील वेळ मोजली जाते. ग्रीनविचनुसार वेळ जाणून घेण्यासाठी GMT मानक वापर केला जातो. ग्रीनविचच्या तुलनेत अमेरिका पश्चिमेला असल्याने तेथे सूर्य उशिरा उगवतो. ग्रीनविचमुळे भारताची गणना पूर्वेकडील देशांमध्ये केली जाते. यामुळेच अमेरिकेची घड्याळे भारताच्या तुलनेत साडेनऊ तास उशिराने मागे असतात. आतापर्यंत तुम्हाला अस्पष्ट कल्पना आली असेल की ‘वेळेतील फरक’ (Date & Time Confusion) हा वेळापत्रकाच्या संदर्भात गोंधळ निर्माण करत आहे.
उदाहरणासह स्पष्टीकरण….
आयसीसीने जाहीर केलेले वेळापत्रक अमेरिकन वेळेनुसार तयार करण्यात आलेले नाही, त्यामुळे आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर पहिला सामना 2 जून रोजी होणार आहे. पण अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे.
यूएसए विरुद्ध कॅनडा सामन्याचे उदाहरण घेता, हा सामना 2 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू होईल. पण त्यावेळी अमेरिकेत 1 जूनला रात्रीचे 8:30 वाजलेले असतील. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या भारतात 2 जूनपासून विश्वचषकाला सुरुवात होणार असली तरी स्पर्धेतील पहिला सामना हा 1 जूनलाच अमेरिकेत सुरू होणार आहे.
भारतीय संघाच्या सामन्याचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार) –
सराव सामना : भारत विरूध्द बांगलादेश (1 जून, रात्री 8 वाजता)
ग्रुप फेरीतील सामने –
भारत विरूध्द आर्यलंड (5 जून, रात्री 8 वाजता)
भारत विरूध्द पाकिस्तान (9 जून, रात्री 8 वाजता)
भारत विरूध्द यूएसए (12 जून, रात्री 8 वाजता)
भारत विरूध्द कॅनडा (15 जून, रात्री 8 वाजता)





