मुंबई – शनिवारी उद्घाटन झालेल्या मुंबईतील मेट्रो मार्गावरील सेवा सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे काही काळ विस्कळीत झाली होती. मागाठाणे येथे एक मेट्रो ट्रेन बिघाडामुळे खोळंबल्याने ती सेवेतून मागे घेण्यात आली.
मुंबईतील मेट्रो 7 च्या या मार्गाचे शनिवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले होते. मागाठाणे आणि आरे स्थानकांदरम्यान हा नवीन मेट्रो मार्ग उभारण्यात आला आहे. तथापि यातील बिघाडामुळे या मार्गावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण ती काहीं वेळातच पुर्ववत करण्यात आली. हा बिघाड नेमका कशा स्वरूपाचा होता याचा तपशील मात्र अजून जाहीर झालेला नाही.
बंद पडलेल्या मेट्रोतील प्रवाशांना मेट्रोच्या दुसऱ्या गाडीत सामाऊन घेण्यात आले आणि त्यांचा पुढील प्रवास सुरळीतपणे पार पाडण्यात आला. या गैरसोयीबद्दल ट्विटर संदेशात मेट्रो कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.