पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 427 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर नवीन 289 करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज दिवसभरात एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी (दि. 2) शहरात 289 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 58 हजार 342 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 4 करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर गेल्या 24 तासात शहरात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4290 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 427 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 52 हजार 732 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5167 संशयित रुग्णांना सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 991 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 329 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1320 इतकी आहे.