अकोले, (प्रतिनिधी) – शिक्षक फौंडेशनद्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार अकोलेतील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील साहित्यिक शिक्षिका दिलशाद यासीन सय्यद यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा १४ मे २०२४ रोजी गुरुदक्षिणा हॉल, नाशिक येथे संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व विद्यार्थ्यांसाठी भविष्यवेधी शिक्षण देत असलेल्या कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक म्हणून अकोलेतील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका दिलशाद यासीन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल अध्यक्ष दीपक चामे ,उपाध्यक्ष मेघराणी जोशी, सचिव सतीश कोळी ,सहसचिव राजश्री पाटील ,जिल्हा समन्वयक वेरोनिका गायकवाड यांनी ही निवड केली असून त्याबाबतचे पत्र सय्यद यांना दिले आहे. सय्यद यांचे निवडीबद्दल हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष, सचिव व स्थानिक स्कूल कमेटीचे पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.