Sanjay Gadhvi – हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
ते सकाळी लोखंडवाला बॅकरोड येथे फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते घामाने भिजले. यानंतर संजय गढवी यांना तातडीने जवळच्या सर्वात मोठ्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र तेथे डॉक्टरांनी संजय गढवी यांना मृत घोषित केले. ‘धूम’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांचे या जगातून जाणे बॉलीवूडचे मोठे नुकसान मानले जात आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशिदीच्या वादावर आधारित या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते. संजय गढवी यांनी ‘धूम’ आणि ‘धूम 2’ दिग्दर्शित केले होते.
त्यांनी ‘तेरे लिए’, ‘किडनॅप’, ‘मेरे यार की शादी है’, ‘ऑपरेशन परिंदे’ आणि ‘अजब गजब लव्ह’ यांसारख्या शानदार चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.