मुंबई – साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या पुढच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. हे शेअर करत धनुष्यने लिहिले, ‘आदर हे स्वातंत्र्य आहे.’ ‘रिस्पेक्ट ही फ्रीडम है असा डायलॉग त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिला आहे. धनुषच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. या पीरियड अॅक्शन चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये धनुषच्या विरुद्ध अभिनेत्री प्रियांका अरुल मोहन असणार आहे.
The most awaited #CaptainMiller First Look on JUNE 30 , 2023 🥁🔥@dhanushkraja @ArunMatheswaran @NimmaShivanna @sundeepkishan @priyankaamohan @dhilipaction @siddnunidop @SathyaJyothi pic.twitter.com/6KxrE8t34c
— G.V.Prakash Kumar (@gvprakash) June 27, 2023
चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये धनुषच्या हातात हेवी मशीन गन दिसून येतीये. यामध्ये तो मृतदेहांच्या ढिगाऱ्यात उभा आहे. तर त्याचवेळी लष्कराचे ट्रक जाताना दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे.
हा चित्रपट तीन भागात बनवला जाणार आहे दुसरीकडे, चित्रपटाचे निर्माते जी. धनंजयन यांनी नुकतेच याबाबत मोठे अपडेट दिले आहेत. हा चित्रपट तीन भागात बनवला जात असल्याचा खुलासा धनंजयनने केला आहे. निर्माते पुढच्या कथेवर सतत काम करत आहेत आणि ती दिवसेंदिवस मोठी होत आहे.
हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर धनुष लवकरच आनंद एल राय यांच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच धनुषने या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये धनुष हातात जळत्या काचेची बाटली घेऊन धावताना दिसत आहे. आनंद आणि धनुष एकत्र काम करण्याची ही तिसरी वेळ असेल. यापूर्वी दोघांनी ‘रांझना’ (2013) आणि ‘अतरंगी रे’ (2021) मध्ये एकत्र काम केले आहे.