मुंबई – दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषनं नुकतीच सोशल मीडियावरून त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली आणि पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. धनुष याने ट्वीट करून आम्ही वेगळ होत असल्याचे जाहीर करत 18 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम दिला आहे. त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी ऐश्वर्याबरोबर 18 नोव्हेंबर 2004 मध्ये झाले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती. धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आई-वडील असून त्यांच्या मुलांची नावे याथरा आणि लिंगा अशी आहेत.
दरम्यान, धनुषनं घटस्फोटाची माहिती देताना सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे की,’‘मित्र, पती-पत्नी, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षं सोबत राहिलो. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा’ या शिवाय अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील केली आहे.