पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे एक 27 वर्षीय ढाबाचालक करोनाबाधित रुग्ण सापडला आहे. गावात करोना रुग्णांची संख्या 9 झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. दोघे बरे झाले असून इतर उपचार घेत आहेत.
या ढाबाचालकाचा अहवाल 18 जुलै रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर गावातील इतर 38 व्यक्तींची करोना तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 37 व्यक्तीचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. करोनाबाधित ढाबा व्यावसायिक व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना तसेच ढाब्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात आलेले आहे. करोना बाधित रुग्णाच्या संपर्क आलेल्या व्यक्तींची माहिती ग्रामपंचायत प्रशासन घेत आहे, असे ग्रामविकास अधिकारी के.
डी. भोजणे यांनी सांगितले. करोनाबाधित रुग्ण सापडले त्या दिवसापासून पारगाव सील करण्यात आलेले आहे. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, बीट जमादार सागर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे आदींनी गावाला भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.