Entertainment : अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या ‘(Hrutha Durgule) ‘फुलपाखरु’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेनंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. टाईमपास 3 या चित्रपटात तिचा दमदार लुक पाहायला मिळाला होता. यातील तिच्या भूमिकेचे सर्वांकडून खूप कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर आता लवकरच ऋता दुर्गुळे एका नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ऋताच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘कन्नी’ असे आहे. मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा विषयावर आधारित हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टरही समोर आले आहे.या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. तर निर्माते अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी आहेत.
View this post on Instagram
विशेष म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील इंद्रा-दिपू अर्थात हृता व अभिनेता अजिंक्य राऊत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. ऋताने ही पोस्ट शेअर करताच हृता-अजिंक्यच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मालिका संपल्यानंतर जवळपास वर्षभराने ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहेत.
या चित्रपटात हृता व अजिंक्य यांच्याबरोबरच शुभंकर तावडे, वल्लरी विराज व ऋषी मनोहर हे कलाकार देखी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी 8 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.