लॉकडाऊन काळात चार महिने कलाकारांना घरी बसावे लागले. पण लॉकडाऊन जसा सुटू लागला तसे कलाकारांनाही हुश्श झाले. याला अभिनेत्री दीपिका पदुकोणही अपवाद नाही. दीपिकाने आपला नवा लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात तिने आपले केस कलर केले आहेत. तिने टाकलेला फोटो पाहता ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसते आहेच. पण खबरदारीचा उपाय म्हणून तिने आपल्या चेहऱ्यावरचा मास्कही काढलेला नाही. तिचा हा क्लोजअप सध्या बराच व्हायरल होत आहे.
दीपिका बऱ्याच महिन्यांनी घराबाहेर पडली. तिच्या हेअर स्टायलिस्टनेही इन्टावर बुमरॅंग टाकला आहे. त्यात दीपिकाचा डाय करण्यापूर्वीचा लूक दिसतो. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंगसह अनेकांची नावं नेपोटिझम आणि अमली पदार्थ सेवनप्रकरणी येताना दिसतायत. दीपिकाचं यात अद्याप नाव नसून कंगनाने ट्विटरवरून रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल यांना खुलं आव्हान दिलं आहे. पण तिची पोस्ट आल्यानंतरही या कलाकारांपैकी कुणीच काही बोललेलं नाही. शिवाय दीपिकाही व्यक्त झाली नव्हती. बऱ्याच दिवसांनी तिने आपल्या सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट केला.