मुंबई – ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या काळात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात कंपन्याकडून वितरकांना विकण्यात आलेल्या वाहन संख्येत 27 टमक्यांची घट नोंदली गेली आहे.
सिआम या वाहन उत्पादकाच्या संघटनेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात कंपन्यांनी वितरकांना 2,26,353 वाहने विकली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव असतांनाही 3,10,694 इतकी वाहने विकली गेली होती.
ऑक्टोबर महिन्यामध्ये दुचाकीची विक्री 25 टक्क्यांनी कमी होऊन 15,41,621 युनिट इतकी झाली आहे. दुचाकीमधील मोटर सायकलची विक्री 26 टक्क्यांनी कमी होऊन 10,17,874 इतकी झाली आहे. स्कूटरची विक्री 21 टक्क्यांनी कमी होऊन 4,67,161 इतकी झाली आहे.
मुळात गेल्या वर्षी वाहन विक्री कमी झाली होती. आता यावर्षी त्या तुलनेतही वाहन विक्री कमी झाली आहे. त्यामुळे वाहन उत्पादक आणि वितरकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहन उत्पादकाच्या संघटनेचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले की, सेमीकंक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन उत्पादकांना पुरेशी वाहने तयार करता येत नसल्यामुळे ग्राहकांना वाहन पुरवठा कमी झाला आहे.