नवी दिली – चारशे फूट खोल खड्ड्यात पडलेल्या ८ वर्षाच्या चिमुरड्यापर्यंत पोहचण्यात एनडीआरएफच्या जवानांना तब्बल ३ दिवसानंतर यश आले. तब्बल ८४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांना बोरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयपर्यंत पोहचण्यात यश आलं. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. मध्यप्रदेशात ह्र्दय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे.
बोरवेलमध्ये पडलेल्या या मुलाचे नाव तन्मय साहू असे होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तन्मय खेळता खेळात अचानक बोरवेलच्या खड्ड्यात पडला. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मंडावी या गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने त्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. बोरवेलच्या समांतर अंतरावर खड्डा करून तन्मयपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु झाला.
#WATCH मध्य प्रदेश | बैतूल ज़िले के मंडावी गांव में 6 दिसंबर को 55 फीट गहरे बोरवेल में गिरे बच्चे तन्मय को निकाल लिया गया है। बच्चे की मृत्यु हो गई है: बैतूल ज़िला प्रशासन pic.twitter.com/x7WP7y5V0v
— ANI_HindiNews (@AHindinews) December 10, 2022
12 फूट लांब सुरंग लावून 44 फूट खोल खड्डा खणण्यात आला. यासाठी तब्बल ३ दिवसांहुन अधिक कालावधी लागला. तन्मयपर्यंत जवान पोहचले तेव्हा तो कोणतीही हालचाल करत नव्हता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 400 फूट खोल खड्ड्यात 39 फुटांवर अडकलेल्या तन्मयला वाचवण्यासाठी ६१ जवान अहोरात्र काम करत होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. तर मुलाच्या कुटुंबियांना ४ लाखाची मदत देखील सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.