विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी क्रिकेट जगतात खऱ्या प्रेमाचे आणि आपुलकीचे उदाहरण घालून देत आहेत. नुकतेच या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड नभा गड्डमवारशी लग्न केले, ज्याचे फोटो त्याने स्वतः शेअर केले आहेत.
CSK ने IPL 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर 12 जून रोजी दोघांनी एंगेजमेंट केली होती. यानंतर देशपांडे यांनी आयपीएल 2024 पूर्वी लग्न केले आहे. आयपीएल 2024 मध्ये तो सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.
जय बजरंगबली Exchanged hearts, in for a new start अशा कॅप्शनखाली सीएसकेचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम द्यायला सुरुवात केली आहे. तुषार देशपांडेने नभाशी लग्न केले आहे. नभा ही व्यवसायाने पेंटर आणि क्राफ्ट आर्टिस्ट आहे. विशेष म्हणजे नभा आणि तुषार एकमेकांना शाळेपासून ओळखतात. तुषारने अनेकदा नभा आपली शाळेपासूनची क्रश असल्याचे सांगितले होते.
View this post on Instagram
तुषार देशपांडेची आयपीएल कारकीर्द
तुषार देशपांडेने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 5 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या. यानंतर तो CSK संघात सामील झाला. आयपीएल 2023 मध्ये तुषारने 16 सामने खेळताना 21 विकेट घेतल्या होत्या.