शेवगाव, (प्रतिनिधी ) – महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मतदारसंघात अडीचशे कोटीचा निधी ग्रामीण रस्त्यांसाठी आला. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ७० कि. मी. रस्ते मंजूर झाले असून, तीन राज्यमार्गांच्या चौपदरीकरणाच्या रस्त्यांनाही मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील विविध गावातील विकासकामाचे उद्घाटनानंतर भातकुडगाव येथील भातकुडगाव -नजन वस्ती ते भायगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण सुधारणा करणे कामासाठी दोन कोटी रुपयाचे कामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची संवाद साधताना त्या बोलत होत्या.
डॉ शाम काळे यांनी भातकुडगावचा काही वर्षापासून बंद पडलेला पशू वैद्यकीय दवाखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली .यावेळी कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापुसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, वाय. डी. कोल्हे, ताराचंद लोढे, भीमराज सागडे, मुसाभाई शेख, लक्षमण काशिद, संदीप खरड, रामदास बडे, महादेव पवार, संतोष आढाव, आप्पासाहेब सुकासे, सुभाष बडधे, नवनाथ फासाटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.