– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले की केवळ या स्पर्धेलाच नव्हे तर देशाला जहीर खानचा वारस मिळाला. महंमद सिराज या गुणी गोलंदाजाकडे आता त्या दृष्टीने पाहायला हरकत नाही. त्याने यंदाच्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बंगळुरुकडून सातत्याने सरस गोलंदाजी केली आहे. अर्थात त्याने भारतीय संघात पदार्पण केल्यापासूनच त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. परंतु या स्पर्धेने त्याच्या गुणवत्तेवर शंका घेणाऱ्यांची तोंडं बंद केली यात शंका नाही.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावरून तर तो केवळ वेगच नियंत्रीत करु शकतो असे नाही तर स्विंगही नियंत्रीत करु शकतो. पाकिस्तानचा स्विंगचा सुलतान वसीम आक्रमक किंवा भारताचा जहीर खान जे करायचे तेच आता सिराज करुन दाखवत आहे. आता कोणी महंमद शमीचे नाव का घेत नाही म्हणून कटकचट करेल पण शमीकडे आपण वरिष्ठ म्हणून पाहात आहोत,
त्यामुळे कदाचीत यंदाच्या वर्षाअखेर भारतात होत असलेली एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा तसेच त्यानतंरच्या एखाद दोन मालिका झल्या की शमी एकतर निवृत्त होइल किंवा सिलेक्टीव्ह होईल. तो प्रत्येक मालिकेत खेळणार नाही. जर त्याला त्याची कारकीर्द वाढवायची असेल तर त्याला क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारातून त्यातही कसोटीतून मात्र, निवृत्त व्हावेच लागेल.
पण सिराजचे तसे नाही अजून वय आहे. तो अद्याप 29 वर्षांचा आहे तसे पाहायला गेले तर तो पुढील किमान चार ते पाच वर्षे सहज खेळू शकतो. त्याने अद्याप 18 कसोटी, 24 एकदिवसीय तर 8 टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएल स्पर्धेत त्याचे 70 पेक्षा जास्त सामने झाले असून त्यात त्याने 70 पेक्षा जास्त बळीही मिळवले आहेत. पंजाबविरुद्ध मात्र, त्याने स्विंग गोलंदाजीचे जे दर्शन घडवले ते पाहता तो खूप काही शिकला आहे.
त्याला परदेशात केळवण्याचा हाच तर लाभ झाला. जहीरचेही तेच होत होते त्याला परदेशात नवा चेंडू हाताळायला मिळत नव्हता; परंतु जेव्हा मिळू लागला तेव्हापासून तोच भारतीय वेगवान गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ बनला. त्याच वाटेवरून सिराजचाही प्रवास सुरू झाला आहे. आता केवळ त्याने तंदुरुस्तीकडेही लक्ष दिले पाहीजे तरच तो लंबी रेस का घोडा बनेल व जहीरचा वारसही.