नगरपरिषदेच्या वतीने खास ऍपची निर्मिती
बारमती- कोविड-19 करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांसाठी नगरपरिषदेने खास “बीएनपी केअर्स’ (BNP Cares) ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर उपस्थित होते. बीएनपी केअर्स या ऍपमुळे नागरिकांना ऍपमधील प्रश्नांच्या उत्तराच्या आधारे स्व चाचणी करता येईल व करोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत घ्यावयाची काळजी याबद्दल जनजागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच ऍपच्या माध्यमातून विविध ठिकाणचे संपर्क क्रमांक व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच बारामतीमधील हॉस्पिटल्स, क्वारंटाइन सेंटर व आयसोलेशन सेंटर याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भितीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी व्यक्त केला.
हे ऍप डाटाविव टेक्नोलॉजीस यांनी बायर प्रयास फाउंडेशनच्या सहायाने विकसित केले आहे. ऍपमध्ये नागरिकांच्या माहितीची गोपनीयता ठेवली जाते, असेही नगरपरिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी गुगल प्ले स्टोरवरुन अथवा https://play.google.com/store/apps/details?id=com.root.rakshakbnp या लिंकवर जाऊन ऍप डाउनलोड करावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.