पुणे – करोनाची तिसरी लाट आता ओसरू लागली आहे. आज सर्वात कमी 700 नवीन बाधितांची नोंद झाली. तर दिवसभरात 2 हजार 197 बाधित करोनामुक्त झाले आहेत. शहरातील आजचा बाधित दर 10.87 टक्के इतका आहे. दिवसभरात 6 हजार 448 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सातशे जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला.
मागील पंधरा दिवसांपासून बाधित संख्या घटत असली तरी मृत्युची संख्या वाढलेली होती. मात्र, आज बाधित संख्येबरोबरच मृत्युच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येते.
शहरात दिवसभरात 2 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला. दरम्यान, सक्रीय बाधित संख्या 7 हजार 489 इतकी असून, त्यातील 35 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 204 बाधित ऑक्सीजनवर आहेत.