Conjoined Twin Abby Hensel Married : 1996 मध्ये ‘द ओप्रा विन्फ्रे शो’मध्ये दिसल्यानंतर ॲबी आणि ब्रिटनी हेन्सेल या जुळ्या बहिणी प्रसिद्धीच्या झोतात आल्या. या दोन बहिणींना दोन चेहरे आहेत पण हृदय आणि बाकीचे शरीर एकच आहे. आता या दोघी बहिणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता दोघांनी एका व्यक्तीशी लग्न केले आहे, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ॲबी आणि ब्रिटनी हेन्सेल या जुळ्या बहिणींनी युनायटेड स्टेट्स आर्मीमधून निवृत्त झालेल्या जोश बॉलिंगसोबत लग्न केले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या या बहिणी शिक्षिका म्हणून काम करतात. पाचवीपर्यंतच्या मुलांना त्या शिकवतात. या जोडीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
असे सांगितले जात आहे की, 2021 मध्येच दोन्ही बहिणींनी जोश बॉलिंगसोबत गुपचूप लग्न केले होते, ज्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये दोन्ही बहिणी जोश बॉलिंगसोबत डान्स करताना दिसत आहेत.
या दोन बहिणींची सर्वात खास गोष्ट म्हणजे ॲबी आणि ब्रिटनी हेन्सेल यांचे शरीर एकच पण दोन डोकी आहेत. कमरेखालील सर्व अवयव एकच आहेत. ॲबी शरीराचा उजवा हात आणि पाय नियंत्रित करते, तर ब्रिटनी शरीराच्या डाव्या बाजूला नियंत्रित करते.
दोघींचा जन्म 1990 मध्ये झाला. जन्मानंतर कुटुंबाने ऑपरेशन करून दोघींना वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता पण ते खूप जोखमीचे होते. डॉक्टरांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर दोघीही जगण्याची शक्यता फारच कमी आहे. यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.