मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण; गाडीत जबरदस्तीने बसवले… CCTV फुटेज समोर

Ahilyanagar News | एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारसभांनी देखील वेग धरला आहे. याचदरम्यान अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्षाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपहरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता काँग्रेस नेत्यांकडून कायदा-सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहे. राज्यात गृहखाते आणि पोलिस काय करत आहे? वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून विरोधकांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. पोलिस काय करतात हा प्रश्न पण आता पडत नाही कारण ते निष्प्रभ ठरले आहेत. गृहमंत्र्यांनी लक्ष घालून या प्रकरणी आरोपींना अटक केली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. Ahilyanagar News |
राज्यातले पोलिस झोपले आहेत का? अहिल्यानगर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे आज सकाळी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे स्पष्ट आहे! गृहमंत्री आतातरी जबाबदारी घेणार आहेत का? ऐन… pic.twitter.com/cnCEyyyMtt
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 26, 2025
वर्षा गायकवाड यांचे ट्वीट
तर वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत लिहिले की, “राज्यातले पोलिस झोपले आहेत का? अहिल्यानगर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे आज सकाळी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे स्पष्ट आहे! गृहमंत्री आतातरी जबाबदारी घेणार आहेत का? ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहेत, गृहखात्याला कारभार झेपत नसेल तर दुसऱ्या कुणाला जबाबदारी द्यावी. या प्रकरणातील आरोपींना अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे! महाराष्ट्र सारख्या राज्यात राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेल आहे की विरोधकांचे अपहरण करून मारहाण करण्यात येत आहे! याची दखल घेऊन तात्काळ कारवाई झाली पाहिजे.” Ahilyanagar News |
नेमकं काय घडलं ?
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर २०२५) सकाळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी सातच्या दरम्यान कार मधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवत अपहरण केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. गुजर यांना टिळकनगर परिसरातील निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली आहे. सध्या गुजर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. Ahilyanagar News |
दरम्यान, सचिन गुजर यांना मारहाण झाल्यानंतर काँग्रेसचे श्रीरामपुरचे आमदार हेमंत उगले, काँग्रेसचे नेते करण ससाने श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. याप्रकरणाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही गंभीर दखल घेतली असून ते श्रीरामपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हेही वाचा:





