Mango Juice Poisoning : राज्यात खळबळ..! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; धक्कादायक कारण समोर…
Mango Juice Poisoning : उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सतर्क करणारी बातमी समोर आली आहे.

Mango Juice Poisoning : अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाल्याची घटना चिंताजनक आहे. डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कॅल्शियम कार्बाइड’मुळे ही समस्या उद्भवली असण्याची शक्यता आहे. (Mango Juice Poisoning)
‘कॅल्शियम कार्बाइड’ हा रसायनयुक्त पदार्थ ओलाव्याच्या संपर्कात आल्यानंतर ‘अॅसिटिलीन’ वायू निर्माण करतो. हा वायू फळे लवकर पिकवतो, मात्र मानवी आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. अशा रसायनांचा वापर करून पिकवलेली फळे खाल्ल्यास चक्कर येणे, उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या उद्भवू शकतात. (Mango Juice Poisoning)
अहिल्यानगरमधील जायभाय कुटुंबातील सदस्यांना आंब्याचा रस खाल्ल्यानंतर चक्कर येणे आणि तोल जाणे अशी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सहा जणांना डिस्चार्ज मिळाला असून एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. (Mango Juice Poisoning)
दरम्यान, पाथर्डी परिसरात केमिकलने पिकवलेल्या आंब्यांच्या विक्रीचा संशय आल्याने आरोग्य विभाग आणि पंचायत समितीकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. (Mango Juice Poisoning)
केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखाल? (Mango Juice Poisoning)

Mango Juice Poisoning : राज्यात खळबळ..! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; धक्कादायक कारण समोर…
आंबा बाहेरून अतिशय पिवळा, पण आतून कच्चा असतो
नैसर्गिक सुगंध कमी जाणवतो
रंग एकसारखा आणि अतिशय चमकदार दिसतो
चव कृत्रिम किंवा बेचव वाटू शकते
सुरक्षिततेसाठी काय करावे? (Mango Juice Poisoning)
आंबे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा
कापण्यापूर्वी नीट धुवा
अतिशय चमकदार किंवा कृत्रिमरीत्या पिवळे दिसणारे आंबे टाळा
शक्यतो नैसर्गिकरीत्या पिकवलेली फळेच खरेदी करा




