योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर एकमेकांना केले अनफॉलो

Yogita Chavan-Saurabh Choughule | ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची जोडी अनेकांच्या पसंतीस पडली. २०२४ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र दोघांचे बिनसल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. एक दीड वर्षांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेल्या या कपलच्या नात्यात आता दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या एकत्र पोस्ट पाहायला मिळत नाहीत. तसेच त्यांनी दिवाळीतही एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाही. इतकेच काय तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. तसेच त्यांच्या लग्नाचेही सोशल मीडियावरील फोटो डिलीट करण्यात आले आहेत. फक्त त्यांचे ग्रुप फोटो, जुने रिल्स आणि मुलाखती सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
योगिता आणि सौरभ यांच्या नात्यात खरंच दुरावा आला आहे की नेमकं एकमेकांना अनफॉलो करण्यामागे काही वेगळं कारण आहे का, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे समजते आहे. अद्याप या जोडप्याने या चर्चेवर अधिकृत विधान केलेले नाही. Yogita Chavan-Saurabh Choughule |
‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर योगिता ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये सहभागी झाली होती. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हंटले जात आहे. Yogita Chavan-Saurabh Choughule |
हेही वाचा :



