Commentator Emotional : रोहित-विराटला ऑस्ट्रेलियात शेवटचं खेळताना पाहून समालोचकही भावूक, VIDEO व्हायरल

Commentator Emotional Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ ने बाजी मारली, परंतु अखेरच्या सामन्यात रोहित-विराटच्या नाबाद १६८ धावांच्या शानदार भागीदारीने भारताला सन्मानजनक विजय मिळवून दिला. या सामन्यात रोहित शर्माने नाबाद १२१, तर विराट कोहलीने नाबाद ७४ धावांची खेळी केली. हा दोघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटचा सामना होता, ज्यामुळे त्यांच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांसह ऑस्ट्रेलियन समालोचकही भारावून गेले.
ऑस्ट्रेलियन समालोचकही भावूक –
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील रोहित-विराटचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे समालोचन करताना एका ऑस्ट्रेलियन समालोचकाला भावनांना आवर घालता आला नाही, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याचबरोबर दुसऱ्या समालोचकाने त्यांच्या खेळीचे भरभरून कौतुक केले. या घटने व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
An australian commentator was seen crying when Kohli and Rohit played their last game in Australia. 🥹💔
Cricket truly unites the people man 🤍 pic.twitter.com/R71605Vh8A
— ` (@45Fan_Prathmesh) October 26, 2025
रोहित शर्मा ठरला मालिकावीर –
या सामन्यानंतर रोहित शर्माला त्याच्या शानदार १२१ धावांच्या खेळीसाठी सामनावीर, तसेच मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसरीकडे, विराट कोहलीने ७५ धावांची खेळी करत एकदिवसीय आणि टी-२० मध्ये एकत्रितपणे भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सेन क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत रोहित-विराटच्या या ऐतिहासिक खेळीला ऑस्ट्रेलियन समालोचकांनी दिलेली भावनिक प्रतिक्रिया पाहायला मिळाली.
रोहित-विराट यानंतर कधी मैदानावर कमबॅक करणार?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना सुमारे एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल. दक्षिण आफ्रिका संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. ही मालिका ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रांची येथे पहिल्या सामन्याने सुरू होईल. दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूर येथे, तर तिसरा आणि अंतिम सामना ६ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल.





