Jamshed Alam Record : ४ चेंडूंत ४ विकेट्स अन् ९ चेंडूंत ५ विकेट्स! पदार्पणातच उत्तर प्रदेशच्या ‘या’ गोलंदाजाने रचला टी-२० इतिहासातील मोठा विक्रम!
Jamshed Alam Record : रेल्वेचा गोलंदाज जमशेद आलमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीने इतिहास रचला. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली.

Railways pacer Jamshed Alam takes 4 wickets in 4 balls : टी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात दोन-तीन विकेट्स घेणे मोठी कामगिरी मानली जाते, मात्र रेल्वेच्या वेगवान गोलंदाज जमशेद आलमने आपल्या पदार्पणाच्याच सामन्यात सर्वांना थक्क केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध सलग चार चेंडूंत चार विकेट्स घेत त्याने नवा इतिहास रचला असून, टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
इंदूरमध्ये सौराष्ट्रच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले –
उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या जमशेद आलमने २२ नोव्हेंबर रोजी इंदूर येथे झालेल्या या महत्त्वाच्या सामन्यात सौराष्ट्रच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने निर्धारित २० षटकांत ५ गडी बाद १८२ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सौराष्ट्रला जमशेदने सुरुवातीच्याच षटकात बॅकफूटवर ढकलत सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.
चौथ्या षटकात जमशेदची जादुई गोलंदाजी –
First Indian bowler to take 4️⃣ wickets in 4️⃣ deliveries on T20 debut 🔥
Only the 3rd bowler to take 4️⃣ in 4️⃣ in #SMAT 👌🎥 WATCH Railways debutant Jamshed Alam’s 𝙝𝙞𝙨𝙩𝙤𝙧𝙞𝙘 5⃣-fer against Saurashtra in SMAT 2026-27 🫡
Updates ▶️ https://t.co/xVJET57kuH
@mflone_ https://t.co/p1B5tZ6IB7
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 22, 2026
सौराष्ट्रच्या डावातील चौथ्या षटकात जमशेदने हार्विक देसाईला झेलबाद करत आपल्या विकेट्सची मालिका सुरू केली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने प्रेरक मांकडला त्रिफळाचित केले. पुढे रुचित अहीरला यष्टीमागे झेलबाद आणि समर गज्जरला पायचीत (LBW) करत त्याने सलग चार चेंडूंत चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून आपले नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले.
अवघ्या नऊ चेंडूंत घेतल्या पाच विकेट्स –
A debut can’t get a lot better than this 🔥
Four wickets in four balls for Jamshed Alam who made his T20 debut for Railways today
#SMAT #SyedMushtaqAliTrophy https://t.co/bJ473lJmrm
— Cricbuzz (@cricbuzz) November 22, 2026
पुढच्याच षटकात सिद्धार्थ राणाला पायचीत करत जमशेदने अवघ्या नऊ चेंडूंत आपले पाच विकेट्स पूर्ण केले. पुरुष टी-२० पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो सहावा भारतीय ठरला. ३८ धावांत ५ विकेट्स घेणाऱ्या जमशेदपुढे सौराष्ट्रची अवस्था ६ बाद ३० अशी झाली होती. अखेर सौराष्ट्र ८ बाद १५३ धावाच करू शकले आणि रेल्वेने २९ धावांनी विजय मिळवला.
दिग्गजांच्या खास क्लबमध्ये जमशेदची एन्ट्री –
टी-२० मध्ये सलग चार चेंडूंत चार विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये यापूर्वी कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुन (२०१९) आणि विदर्भाच्या दर्शन नळकांडे (२०२१) यांचा समावेश होता. दोघांनीही २० व्या षटकात ही कमाल केली होती. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२५ मध्ये इंडोनेशियाच्या गेडे प्रियांदानाने ६ चेंडूंत आणि फिनलंडच्या महेश तांबेने ८ चेंडूंत पाच विकेट्स घेतले होते.





