SL vs NZ : श्रीलंकेविरूध्दच्या टी-20 अन् वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, सँटनरच्या खांद्यावर सोपविली मोठी जबाबदारी…

New Zealand Squad : न्यूझीलंडने नुकतीच घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडकडून मालिका गमावल्यानंतर न्यूझीलंड आता श्रीलंकेच्या यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. वास्तविक न्यूझीलंड संघाला आता श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची असून त्यासाठी आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं आपल्या दोन्ही संघांची घोषणा केली आहे.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल. दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. फूल टाईम कॅप्टन झाल्यानंतर सँटनरचा हा पहिलाच दौरा असेल. 22 वर्षीय युवा फलंदाज बेव्हन जेकब्सला प्रथमच राष्ट्रीय संघाने पाचारण केले आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, जी 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी, 5 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे आणि शेवटचा सामना 11 जानेवारीला होणार आहे.
रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ यांसारख्या बलाढ्य खेळाडूंचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. जेकब डफीचा टी-20 आणि वनडे या दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. टॉम लॅथमची टी-20 मालिकेसाठी संघात निवड झालेली नाही आणि तो वनडे मालिकेत संघात सामील होणार आहे.
विल ओ’रुर्केला विश्रांती…
युवा यष्टिरक्षक ‘मिच हे’ याचा वनडे आणि टी-20 या दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेत विकेटकीपिंग कव्हर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. कारण टॉम लॅथम वनडेत मुख्य यष्टिरक्षक असेल. विल ओ’रुर्के, विल यंग आणि लॅथम यांची केवळ एकदिवसीय संघात निवड झाली आहे. तर जेकब्स, फॉल्केस आणि रॉबिन्सन यांना फक्त टी-20 संघात स्थान मिळाले आहे. विल ओ’रुर्कला टी-20 संघातून विश्रांती देण्यात आली आहे. कारण त्याने भारत, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सर्व 8 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला होता.
ICYMI | Our T20I and ODI squads for the upcoming KFC T20I and Chemist Warehouse ODI series’ against @OfficialSLC 🏏 #SLvNZ pic.twitter.com/K5UqBLaRbm
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 22, 2024
श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडचा टी-20 संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, बेव्हॉन जेकब्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, नॅथन स्मिथ.
न्यूझीलंडचा श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, मिच हे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुक, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ आणि विल यंग.
मालिका वेळापत्रक खालीलप्रमाणे….
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात 28 डिसेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना 30 डिसेंबरला तर शेवटचा सामना 2 जानेवारीला होणार आहे. वेगवान क्रिकेटच्या थरारानंतर दोन्ही संघ 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये आमनेसामने दिसणार आहेत. 5 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 8 तारखेला आणि अंतिम सामना 11 जानेवारीला ऑकलंडमध्ये खेळवला जाणार आहे.





