IND vs AUS : रोहित शर्माचं अनोखं शतक! वनडेत अशी कामगीरी करणारा ठरला सहावा भारतीय

रोहित शर्माने केलं एक अनोखं शतक –
रोहित शर्माने या सामन्यात दोन शानदार झेल घेत वनडे क्रिकेटमध्ये 100 झेलांचा टप्पा गाठला. त्याने हर्षित राणाच्या गोलंदाजीवर मिचेल ओवेन (1 धाव) आणि प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर नॅथन एलिस (16 धावा) यांचे झेल टिपले. यासह रोहित भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक झेल घेणारा सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी विराट कोहली, मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुरेश रैना यांनी हा पराक्रम केला आहे. रोहितने या खास कामगिरीसह दिग्गजांच्या क्लबमध्ये प्रवेश केला.
Milestone unlocked 🔓
Rohit Sharma completes his 100th catch in ODIs 🙌#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/OORJncEFJI
— BCCI (@BCCI) October 25, 2025
भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक:
- विराट कोहली: 163
- मोहम्मद अझहरुद्दीन: 156
- सचिन तेंडुलकर: 140
- राहुल द्रविड: 124
- सुरेश रैना: 102
- रोहित शर्मा: 100
विराट कोहलीने जॅक कॅलिसला टाकलं मागे –
विराट कोहलीनेही या सामन्यात दोन झेल घेत मैथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 339 झेल घेत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस (338 झेल) याला मागे टाकले आहे. भारतीय संघाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत रोखले असून, आता भारताच्या फलंदाजांवर विजयासाठी 237 धावांचे लक्ष्य पाठलाग करण्याची जबाबदारी आहे.





