T20 World Cup 2024 (SA vs AFG, Semi-final 1) :- टी-२०विश्वकरंडक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना त्रिनिदादमध्ये खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९ गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवून पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यासाठी जी खेळपट्टी बनवली होती, त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.
उपांत्य लढत सारख्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या ५६ धावांवर अफगाणिस्तानला सर्वबाद केले. यानंतर क्रिकेट तज्ञ आणि समालोचकांनीही आयसीसीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. राशिद खानने सुद्धा तक्रार केली आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. त्यांच संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला, त्यावेळी खेळपट्टीवर एक असामान्य उसळी पहायला मिळाली. त्याशिवाय या खेळपट्टीवर अनेक तडे सुद्धा गेलेले होते. याचा उल्लेख ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पॉलक यांनी खेळपट्टी अहवालातही म्हटले आहे. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये अफगाणी फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली हे घडल्यावरल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
समालोचक करताना संजय मांजरेकर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी ख्ळपट्टी खूप खराब असल्याचे म्हटले. त्यांनी आयसीसीला प्रश्न विचारले. या दोन दिग्गज खेळाडूंच्या मते, इतक्या महत्त्वाच्या सामन्यासाठी ही खूपच खराब खेळपट्टी होती. न्यूयॉर्कपेक्षा सुद्धा ही खराब खेळपट्टी असल्याच ते म्हणाले. मोहम्मद कैफनेही आयसीसीवर ताशेरे ओढले आहेत.
विमानाला चार तास उशीर
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने सुद्धा आयसीसीला काही प्रश्न विचारले आहेत. नाणेफेकीच्यावेळी त्याने सांगतिलं की, त्यांचे विमान त्रिनिदादला चार तास उशिराने पोहोचली. त्यामुळे खेळाडूंना आराम करायला आणि सरावालाहीवेळ मिळाला नाही.